सातारा : घरात अनाधिकाराने प्रवेश केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 ते 14 दरम्यान डॉ. श्रद्धा सखाराम पिंगळे रा. शाहूपुरी, सातारा यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बंगल्यात प्रवेश केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.
अनाधिकाराने घरात प्रवेश केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 February 2025