फलटणच्या आत्महत्या प्रकरणावर खासदार उदयनराजे यांचा संताप; मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची दिली प्रतिक्रिया

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा :  खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात सक्रिय असणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी फलटणच्या आत्महत्या प्रकरणावर संताप व्यक्त करत याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची दिली प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, या प्रकरणासंदर्भात आपण निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. या प्रकरणांमध्ये जे कोणी असतील त्यांच्या संदर्भाने पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून याबाबत अहवाल द्यावा. चौकशी सुरू आहे खरं काय खोटं काय हे मला माहित नाही. पण असे अनुचित प्रकार घडता कामा नये. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेशिवाय दुसरे काही असू शकत नाही, अशी थेट प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणावर दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात आंदोलनाच्या दणक्याने शासकीय कार्यालयातील एसी गारठला; सुनील शिंदे यांच्या आंदोलनाला आले यश
पुढील बातमी
रहिमतपूरमध्ये बाळासाहेब पाटील गटाला खिंडार; अनेकांचे आ. मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश

संबंधित बातम्या