खंडाळ्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाईटच्या खांबाला धडक देत ट्रक पलटी; विचित्र अपघातात अकरा लाख रुपयांचे नुकसान

by Team Satara Today | published on : 02 November 2025


खंडाळा :  पुणे - बंगळूरू महामार्गावरील खंडाळा-पारगाव येथे ट्रकच्या विचित्र अपघातात एकूण चार वाहने व हायमास लाईटचा खांब मिळून अकरा लाखांचे नुकसान झाले आहे. रविवारी (दि.2) दुपारी दीडच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने असणाऱ्या पारगाव कमानीसमोर हा अपघात घडला.

यामध्ये ट्रक (टी.एन.34व्ही4789) चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या दुभाजकाजवळ असणाऱ्या हायमास लाईटच्या खांबाला धडक देत ट्रक पलटी झाला. यावेळी ट्रकची मागील बाजू शेजारी उभ्या असलेल्या टोइंग क्रेन (एम.एच.11बी.झेड8801) व चारचाकी वाहनावर (एम.एच.11बी.डी.6145) पडल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तर हायमास खांब ग्रामपंचायतच्या घंटागाडीवर (एम.एच.11ए.बी.8273) पडला.

याप्रकरणी जालिंदर मुळीक याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक सेल्वोकुमार एम. आरमुगम (रा. कोगु, ता. तिरीचंगुड, जि. नामकल, राज्य-तामिळनाडू) याच्यावर खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मलकापुरात जुन्या भांडणातून गुप्तीने भोकसून मित्राचा खून; एकास अटक
पुढील बातमी
जुन्या एमआयडीसीतील संगमनगर परिसरात तीन लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या