खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा उतरले

एकनाथ शिंदे मुंबईला मोटारीने रवाना

by Team Satara Today | published on : 18 October 2024


सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे, ता. महाबळेश्वर गावी एक दिवसाच्या दौर्‍याकरता आले होते. दरम्यान हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावातील हेलिपॅड वर उतरवण्याची वेळ आली. मात्र तातडीच्या कामासाठी मुख्यमंत्री शिंदे मोटारीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून निवडणुकांच्या प्रक्रियेची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री हेलिकॉप्टरने आपल्या मूळ गावी आले होते. आज पुन्हा मुंबईला परत जाताना ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाला अडथळा निर्माण झाला. हेलिकॉप्टरने दरे येथील हेलिपॅड वरून उड्डाण घेतले होते. मात्र खराब हवामाना असल्यामुळे हेलिकॉप्टरने पुढे जाणे अशक्य असल्याचे पायलटने सांगितले. त्यामुळे पुन्हा हेलिकॉप्टर तातडीने माघारी वळवून हेलिपॅड वर उतरवण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अत्यंत गोपनीय मानला जात आहे. त्यांचा नियोजित दौरा आटोपून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर मागवले होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोटारीने मुंबईला रवाना झाले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शहीद जवान गणेश शिंदे अनंतात विलीन
पुढील बातमी
सातारा आयटीआय संस्थेला दिलेले रामदास स्वामींचे नाव बदलावे

संबंधित बातम्या