फलटण, दि. १६ : फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून कार्यरत असलेले निखिल मोरे यांची बदली पुणे येथे उपायुक्त म्हणून बढती वर झालेली असून त्यांच्या जागी सांगली येथे कार्यरत निखिल जाधव यांनी आज पदभार स्विकारला.
निखिल मोरे यांनी पदाधिकारी पासून चतुर्थ श्रेणी कामगार, अधिकारी सर्व जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते .त्यामुळे प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनात त्यांचा आदर व आत्मीयता निर्माण झाली. शहरातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच वैयक्तिक पातळीवर लक्ष घातले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटणमध्ये मुक्कामी असताना नगरपालिकेच्या माध्यमातून वारकरी बांधवांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशंसनीय कार्य त्यांनी केले. यावेळी वारकऱ्यांनी प्रशासनाचे खुलेपणाने कौतुक केले. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्ष नगरपालिकेत जाऊन श्री. निखिल मोरे आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाला फेटा बांधून सन्मान केला होता. या सन्मानामुळे नगरपालिका प्रशासनाला एक नवी ऊर्जा मिळाली होती.सांगली येथे कार्यरत निखिल जाधव यांनी आज पदभार स्विकारला. निखिल जाधव पाचगणी नगरपरिषदेत सुद्धा कार्यरत होते .