लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी

by Team Satara Today | published on : 19 December 2024


सातारा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने खिशातील पैशांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुचाकीवर लिफ्ट देतो, असे सांगून खिशातील 5300 रुपये काढून चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 2 डिसेंबर रोजी आर.के. बॅटरी चौकात घडली आहे. याप्रकरणी अमोल बबनराव जाधव (वय 37, रा.गुरुवार पेठ, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंध असल्याचा गैरफायदा घेवून ही चोरी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातातील जखमीचा मृत्यू
पुढील बातमी
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता

संबंधित बातम्या