सातारा : अपघात करुन एकास जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कमानी हौद चौक परिसरात कार व दुचाकीचा अपघात झाल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. प्रसन्न पुष्कर पुरोहित (वय 27, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी दिग्विजय दादासो कुंभार (वय 21, रा. गोडोली) याच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 22 डिसेंंबर रोजी घडली आहे.