सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2025 दरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी प्रतीक संतोष पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.