वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅसची टंचाईच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात वंचितची निदर्शने

by Team Satara Today | published on : 17 March 2026


सातारा  : देशासह राज्यातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅसची टंचाई यासह वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टिन प्रकरणात केलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार निदर्शने केली.

याबाबत वंचितने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. आखातातील युध्दामुळेे देशात पेट्रोल-डिझेल-गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. देशातील मोठ्या नेत्यांसह, उद्योजक व प्रतिष्ठीतांचे नाव एपस्टिन प्रकरणात आल्यामुळे जागतिक पातळीवर भारताचे नाव खराब झाले आहे.

देशात अराजकात आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे मोदी-शहांच्या जवळचे उद्योगपती देशात व परदेशात अब्जावधी रूपयांची गुंतवणूक करत आहेत. आज देश त्यांच्याच इशाऱ्यावर चालत आहेत. सर्वसामान्य माणूस आणखी गाळात रूतत आहे. सत्ताधाऱ्यांना याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करत, दलितांवर अन्याय केला आहे.

तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस कार्यालयावर मोर्चाचा इशारा दिल्यानंतर भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्त साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने, जिल्हा उपाध्यक्ष संदिप कांबळे, बाळासो जगताप, कुमार ओव्हाळ, राकेश जाधव, विनोद ओव्हाळ,भागवत करडे, विजय वानखेडे, उज्वला वानखेडे, उषा गवळी, दिपक गवळी यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजेशिर्के घराण्याकडून धर्मवीरगडावर येणाऱ्यांचा सन्मान ; महाराणी येसुबाईंची प्रतिमा भेट देण्याचा अभिनव उपक्रम
पुढील बातमी
छ. संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम; धर्मवीर ज्वालाचे स्वागत, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, मूक पदयात्रा

संबंधित बातम्या