सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन ट्रक मधील पाच बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 ते 28 दरम्यान एमआयडीसी सातारा येथून सचिन चंद्रकांत घाडगे राहणार सदर बाजार सातारा यांच्या ट्रक क्र. एमएच 11 डीव्ही 5525 मधील सात हजार रुपये किंमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 6 ते 18 दरम्यान संतोष बाळकृष्ण पिसाळ रा. सदर बाजार, सातारा यांच्या सदर बाजार सातारा येथील म्हाडा कॉलनी च्या मागील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या दोन ट्रक मधील चार बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.