अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात आढळली दोन शिवलिंग

by Team Satara Today | published on : 05 December 2024


कोल्हापूर : करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात छोट्या दोन देवळींमध्ये शिवलिंग आढळले आहे. माउली लाॅजच्या खाली असलेल्या दगडी भिंतींसमोरील माती, दगडाचा ढिगारा काढताना हे शिवलिंग आढळले, तर तिसरी एक देवळी रिकामी आहे.

अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या जतन संवर्धनाचे काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सुरू करण्यात येत आहे. अत्यंत कासवगतीने सुरू असलेले या कामात सध्या कुंडाच्या परिसरातील ढिगारा हटविण्यात येत आहे. हे करताना माउली लॉजच्या खालच्या बाजूला असलेल्या मणिकर्णिका कुंडाच्या दगडी भिंतींमध्ये तीन देवळी आढळले आहेत. यातील दोन देवळींमध्ये शिवलिंग आहे व तिसरी देवळी रिकामी आहे. कुंच्च्या जतन संवर्धनासाठीचे दगड घडविण्याचे काम सध्या सुरू असून, त्याला अजूनही कासवगतीच आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिल्ली विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीपूर्वीच राजकीय संन्यासाची घोषणा
पुढील बातमी
स्वारगेट-कात्रज मार्गावर होणार चार मेट्रो स्थानकं

संबंधित बातम्या