सातारा : गटविकास अधिकारी असलेल्या पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी शाहूनगर, सातारा येथील सहायक सरकारी वकिलासह दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील संपतराव पवार व निर्मला संपतराव पवार (दोघे रा. ४६, नेस्ट कॉलनी, हिलटॉप कॉलनी, चारभिंतीजवळ, शाहूनगर, गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांच नावे आहेत. अंजली स्वप्नील पवार (लग्नाआधीचे नाव अंजली रवींद्र बर्गे (वय ३३, रा. लेकव्ह्यू रेसिडेन्सी, गोडोली, सातारा) यांनी फिर्याद दिली.
लग्नात काढलेल्या फोटोचे पैसे तूच दे, असे म्हणत गाडीत वाद घालून अविश्वास दाखवत अपमान, शारीरिक छळ, दागिन्यांची सतत मागणी करून वाद घालत मला कायदा शिकवू नकोस, मी कोर्टात हे रोज करतो, तुला नांदायचे असेल तर नीट नांद नाहीतर माहेरी निघून जा असे पतीने म्हटल्याचे व सासूने हुंड्यासाठी छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.