सातारा : घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रदीप धर्मेंद्र पोफळे रा. संभाजीनगर, सातारा यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांचा भाऊ संदीप याला मारहाण, तसेच त्यांच्या पत्नीस शिवीगाळ केल्याप्रकरणी निखिल जगदीप पवार रा. कोडोली, एमआयडीसी सातारा व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.