आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पौष्टिक आहार आणि तो पौष्टिक आहार घेण्याची योग्य वेळ या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे आपले आहाराचे रुटीन असते. खाण्या - पिण्याची योग्य वेळ देखील आपल्या शरीरावर परिणाम करत असते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आयुर्वेदानुसार नाश्ता, जेवणाची योग्य वेळ जाणून त्याप्रमाणे खाण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या शरीरासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो.
सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अनेक बदल झाले आहेत. दिवसभराच्या बिझी रुटीन आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. योग्य वेळी सकस, पौष्टिक आहाराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. शक्यतो आपण रात्रीचे जेवण वेळेत घेत नाही आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. रात्रीचे जेवण योग्य वेळेत न घेण्याची अनेक कारणे असू शकतात. याचबरोबर आपण रात्रीच्या जेवणात काही चुकीचे पदार्थ देखील खातो. यांचा आपल्या रात्रीच्या झोपेवर आणि पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे होऊ नये यासाठी रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ नेमकी कोणती असावी ते पाहूयात.
रात्रीचे जेवण योग्य वेळेत करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. असे असले तरीही सध्याच्या काळात अनेक कारणांमुळे आपले रात्रीचे जेवण घेण्याची वेळ ही कायम चुकीची असते. कधी आपण ऑफिसमधून लेट येतो, टिव्ही पाहण्यात आणि मोबाईल फोन वापरण्यात व्यस्त असल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे आपल्याला रात्रीचे जेवण करण्यास उशीर होतो. दिवसभर कामाच्या गडबडीत असल्याने रात्रीचे जेवण योग्य वेळी घेणे फार महत्वाचे असते. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो आणि रात्रीच्या झोपेतही अडथळा निर्माण होतो.
IANS च्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञ आणि काही संशोधनांनी असे सुचवले आहे की तंदुरुस्त राहण्यासाठी रात्रीच्या जेवणाकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच, काही पदार्थ आहेत ज्यांना खाण्यासाठी नाही म्हणणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. सकाळचा नाश्ता बऱ्यापैकी हेव्ही असावा आणि रात्रीचे जेवण खूप हलके असावे. यामुळे चयापचय आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत मिळते. हेव्ही अन्नपदार्थांमुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. रात्रीच्या जेवणाला शक्यतो उशीर करू नये.
रात्रीचे जेवण आणि झोप यात किमान तीन तासांचे अंतर असावे. रात्रीच्या जेवणात चपाती, डाळ, मिक्स भाज्या, कोशिंबीर आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. याचे सेवन केल्याने आरोग्य आणि पचनक्रिया दोन्ही उत्तम राहते. सूप, भाज्यांची कोशिंबीर, ओट्स आणि दलिया यापासून बनवलेली खिचडी असे पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहेत. हे पचण्यायोग्य म्हणजेच सहज पचणारे असतात. त्यामुळे एकंदरीत सांगायचे तर रात्री जेवणासाठी खाल्ले जाणारे अन्नपदार्थ हे पचण्यासाठी सोपे असावेत.
आपल्यापैकी बऱ्याचजणांना रात्रीच्या जेवणांनंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते, पण रात्रीच्या जेवणानंतर चहा, कॉफी प्यायल्याने झोप येण्यास त्रास होतो. यामुळे रात्रीच्या झोपेत अडथळा निर्माण होतो. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, जे तुमच्या झोपेवर अगदी गंभीर परिणाम करु शकते. अशा स्थितीत रात्रीच्या जेवणानंतर चहा, कॉफी पिणे टाळावे. रात्रीच्या जेवणानंतर थोड्या वेळाने कोमट दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, यामुळे हाडे मजबूत होतात आणि चांगली झोपही येते.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |