सातारा : सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात तीन लाख 86 हजार 455 मतदार हे 10 नगरपालिकांच्या 115 प्रभागातील 233 उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार एक लाख 91 हजार 464 व महिला मतदार 124732 इतके आहेत. या तपशीलाची माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. यावेळी नगर प्रशासन विभागाचे सहआयुक्त अभिजीत बापट, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होत्या.
संतोष पाटील पुढे म्हणाले, उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दहा ते 17 नोव्हेंबर यादरम्यान राबवण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 18 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासुन होणार असून नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दि. 19 ते 21 यादरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत आहे यासंदर्भात अपील असल्यास दिनांक 21 ते 25 या दरम्यान जाहीर करण्यात येईल .निवडणूक चिन्ह नेमून अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे .दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान व दिनांक 3 डिसेंबर रोजीमतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजपत्रांमध्ये दिनांक दहा डिसेंबर रोजी या निकालाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात दहा नगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 437 मतदान केंद्रीय असून यामधून 3 लाख 86 हजार 455 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत .इतर मतदार 59 आहेत .मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या 1 लाख 94,732 पुरुष मतदारांची संख्या एक लाख 91 हजार 464 इतकी आहे .राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील. मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजता प्रचार बंद होईल व त्याच दिवशी रात्री दहा वाजता ध्वनीक्षेपकांचा आवाज बंद होणार आहे .मतदारांसाठी Mahasecvoter list . inहे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे यामध्ये सर्च नेम इन्व्हर्टर लिस्ट यावर क्लिक करून नाव किंवा एपिक क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येणार आहे. जिल्ह्यात 437 मतदान केंद्रावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 532 कंट्रोल युनिट 1074 बॅलेट युनिटची उपलब्धता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अ वर्ग नगरपालिकेसाठी नगराध्यक्षांना 15 लाख तर उमेदवारांना पाच लाख रुपये खर्चाची, ब वर्ग नगरपालिकेसाठी नगराध्यक्षांना ११ लाख २५ हजार तर नगरसेवकांना साडेतीन लाख, क प्रवर्ग नगरपालिकांसाठी नगराध्यक्षांना साडेसात लाख व नगरसेवकांना अडीच लाख, नगरपंचायत क्षेत्रासाठी नगराध्यक्षांना सहा लाख रुपये व नगरसेवकांना सव्वा दोन लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे.