फोन करण्यासाठी वॉचमनकडून मोबाईल मागून काढला पळ; अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 05 March 2026


सातारा : अजिंठा चौक ते पंचामृत हॉटेलच्या दरम्यान अज्ञात तिघांनी  महादेव आत्माराम शेडगे (वय ५२, रा. अंगापूर, सध्या रा.अमरलक्ष्मी कोडोली सातारा) यांच्याकडून फोन करण्यासाठी ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेतला. तो परत न देता तिघांनी मोबाईल घेऊन पळ काढला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विसावा नाका येथील रिलायन्स मॉलसमोर मारामारीप्रकरणी ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
फाईव्हस्टार हॉटेलमधील रूमच्या भाड्यातून महिना दोन टक्के नफा देण्याचे आमिष; साताऱ्यातील ६ जणांची ५८ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक

संबंधित बातम्या