08:54pm | Jul 27, 2023 |
फलटण : ट्रान्सफॉर्मर मधून तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून तब्बल 18 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ट्रान्सफॉर्मर मधून तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी धुमाकूळ घालत होती. डी पी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार्या डी पी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन त्यांची उकल करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे विशेष पथकाने त्या अनुषंगाने आरोपींचा शोध तांत्रीक विश्लेषण करुन संतोष जगन्नाथ घाडगे, सागर युवराज घाटगे, किरण भिमराव घाडगे (सर्व रा. मलटण, ता. फलटण) व त्यांचे इतर साथीदार यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण तपास पथकाने त्यांचा शोध घेवुन वरील आरोपी पैकी संतोष जगन्नाथ घाडगे, सागर युवराज घाडगे, किरण भिमराव घाडगे (सर्व रा. मलटण, ता. फलटण) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी इतर साथीदारांसह फलटण तालुक्यामध्ये वाठार पोलीस ठाणे व लोणंद पोलीस ठाणे व फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमधील डी पी चोरी केले असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांच्याकडुन विविध ठिकाणी चोरी केलेले सुमारे 3 लाख 80 हजार रुपये किंमतीचे एकूण 380 किलो वजनाचे तांबे व चोरी करण्यास वापरलेले वाहन ओमनी असा एकूण 8 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक संशयितांनी आणखी कोठे काही गुन्हे केले आहेत काय, याचा तपास पुढे चालु आहे.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, पोलीस हवालदार अरुण शेंडे, महादेव पिसे, पोलीस नाईक नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तुषार आडके, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार, तुषार नलवडे, हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |