सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता करंजे हद्दीतील आंदेकर चौक ते राधिका रोड जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाच्या मनगटावर कोयत्याने वार करून तसेच लाकडी स्टंप ने त्याच्या डोळ्यावर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी अभय आवारे, आयुष घोटकर, पार्थ भोसले, अभय आवारेची मोटरसायकल चालवणारा त्याचा मित्र (पूर्ण नाव पत्ते माहीत नाहीत) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.