सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काटे म्हणाले, संभाजी ब्रिगेड व पक्षाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण नाव वापरावे किंवा संघटनेचे नाव तरी बदलावे. जर त्यांनी यास नकार दिला तर प्रशासनाने तत्काळ या संघटना व पक्षांची नोंदणी रद्द करावी.
संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष सातत्याने छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत आहेत. हा प्रकार शिवभक्तांच्या भावना दुखावणारा आहे. तसेच या संघटनेच्या नावामुळे अनेक नागरिक अनवधानाने संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत. संभाजी महाराज यांच्या नावाने संघटना काढून धर्माविरोधात काम करत आहेत. सर्वत्र खंडणीखोर संघटना म्हणून त्या संघटनेची ओळख असून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक कायदा करावा, या मागणीचे आपण स्वागत करीत असल्याचे काटे यांनी सांगितले.त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण नाव वापरावे किंवा संघटनेचे नाव बदलावे
शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांचे प्रतिपादन
by Team Satara Today | published on : 06 April 2025

सातारा : छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी
उल्लेख संभाजी ब्रिगेडकडून होत आहे. संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाने धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण नाव वापरावे किंवा संघटनेचे नाव बदलावे. त्याअनुषंगाने
सोमवार दि. 7 रोजी शिवधर्म फाउंडेशनच्यावतीने शिवतीर्थ ते
जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक दीपक
काटे यांनी दिली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा