जिल्ह्यात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

by Team Satara Today | published on : 30 May 2025


सातारा : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सातारा जिल्ह्यात आज दि. २९ मे रोजी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली.

क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात १ आणि सह्याद्री रुग्णालयात १ असे एकूण २ रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांवर उपचार  सुरु असून दोघांची प्रकृती चांगली आहे. 

सातारा जिल्ह्यात चार वर्षापूर्वी कोरोनाने थैमान घातले होते. आज मितीस कोरोनाची लाट यापूर्वी होती तशी जरी नसली तरी खबरदारी म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने थंडी, ताप, जुलाब अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत, वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण तात्काळ बरा होत असल्याचे डॉ. युवराज करपे यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बदल्याच्या आंदोलनास महासंघाचा पाठिंबा : काका पाटील
पुढील बातमी
निराधार मुलांच्या सर्वेक्षणासाठी 'साथी मोहीम'

संबंधित बातम्या