सातारा : शहर परिसरातील १३ वर्षीय अल्पवयीन युवतीवर जबरदस्ती अत्याचार करून तिला दीड महिन्याची गरोदर केल्याप्रकरणी एका ३६ वर्षीय नराधमावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी संभोगसह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज कांताराम खामकर (वय ३६ वर्ष, मूळ रा. अनावळे पोस्ट यवतेश्वर, सध्या रा. शुभम रेसिडेन्सी रामाचा गोट सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जानेवारी २०२६ महिन्यात तब्बल दोन वेळा अल्पवयीन पीडितेला तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपी याने त्याच्या मोबाईल वरून फोन करून तिला तिच्या घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बोलावून घेतले. यावेळी आरोपीने पीडीतेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर ती दीड महिन्याची गरोदर राहिली.याची कल्पना पीडितेने कुटुंबियांना दिल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी पीडीतेच्या आईने तात्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबरी संभोगसह पोस्कोचा गुन्हा दि. ६ रोजी दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोवेकर करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.