सातारा : साताऱ्यात वाय.सी कॉलेजसमोर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी जात असताना ऋतुराज तुळशीराम गरड (वय २० रा. प्रतापसिंह नगर) याच्या डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने हल्ला करून जखमी करण्यात आले आहे.
याप्रकरणी चिन्मय अनंत बल्लाळ, वेदांत दयाराम कदम आणि त्याच्या एका साथीदारावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बोराटे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.