वनविभागाच्या वतीने ‘कचरामुक्त कास पठार’ उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम; एनसीसी, हरित सेनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

by Team Satara Today | published on : 28 March 2026


सातारा : वनविभाग सातारा यांच्या वतीने ‘कचरामुक्त कास पठार’ या सामाजिक उपक्रमांतर्गत जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पुष्प पठार येथे व्यापक स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली.

या मोहिमेत न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील एनसीसी व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच सातारा वनविभागातील अधिकारी-कर्मचारी, कास पठार कार्यकारी समितीचे स्वयंसेवक यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. कास पठारासह आजूबाजूच्या परिसरातील तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा गोळा करण्यात आला. चोरटका ते कासानी पार्किंग, मुख्य गेट ते चोरटका तसेच नवरा-नवरी डोंगर ते वेस्टर्न घाट हॉटेल या मार्गावरील कचरा साफ करण्यात आला.

या उपक्रमास उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रौंदळ तसेच वनपरिक्षेत्राधिकारी जोपळे यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. कौस्तुभ वैद्य, उपमुख्याध्यापक श्री. खोमणे, पर्यवेक्षक श्री. कल्याणकर, सौ. अनिता कदम, सौ. राधिका देशपांडे तसेच एनसीसी नेव्ही ऑफिसर श्री. कैलास बागल यांची उपस्थिती होती.

स्वच्छता मोहिमेत वनविभागातील राजाराम काशीद (वनपाल, रोहोट), उज्वला थोरात (वनपाल, बामणोली), समाधान वाघमोडे (वनरक्षक, कास), प्रकाश शिंदे (वनरक्षक, रोहोट) तसेच जयंत निकम (वनरक्षक, खडगाव) यांनी सक्रिय सहभाग घेतला. संकलित कचरा एकत्र करून तो सातारा नगरपरिषद यांच्या वाहनाद्वारे कचरा डेपोत पाठविण्यात येणार आहे. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत कास पठाराचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोहन भागवत यांचा साताऱ्यामध्ये दौरा; जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांच्या निवास आणि सदिच्छा भेट, तगडा पोलीस बंदोबस्त
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत ४ एप्रिलला सभापती निवडी; गोंधळाची पुनरावृत्ती आणि प्रशासनाची नामुष्की टाळण्याचे आव्हान

संबंधित बातम्या