सातारा : महिलेसह तिच्या भावाला मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून रंजना बाबुराव खरात तसेच त्यांच्या भावास मारहाण केल्याप्रकरणी पती बाबुराव भागोजी खरात, सासू भागाबाई भागोजी खरात आणि सासरे भागोजी सखाराम खरात (सर्व रा. मालदेव, पोस्ट ठोसेघर, ता. सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार वायदंडे करीत आहेत.