देवाभाऊ फाउंडेशनच्या सातारा लोकसभा समन्वयकपदी सदाशिव नाईक यांची निवड

मुख्य समन्वयक गजानन जोशी यांच्याकडून निवड ; भाजप पदाधिकार्‍यांकडून अभिनंदन

by Team Satara Today | published on : 15 September 2025


सातारा, दि. 14  :   महाराष्ट्र जनजाती बेडर, बेरड समाज उत्थान समितीचे अध्यक्ष सदाशिव नाईक यांची देवाभाऊ फाउंडेशनच्या सातारा लोकसभा समन्वयकपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा भाजप पदाधिकार्‍यांकडून अभिनंदन होत आहे. 

देवाभाऊ फाउंडेशनच्या सातारा लोकसभा समन्वयक पदाच्या पश्चिम महाराष्ट्रातील निवडी फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य समन्वयक गजानन जोशी व प्रदेश सह समन्वयक डॉ. आशुतोष घोलप यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये सातारा सातारा लोकसभा समन्वयकपदी सदाशिव नाईक यांची निवड केल्याचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले आहे. संघटनेच्या विविध कार्यात सक्रीयतने काम करताना संघटेचे विचारधारा जोपासण्यासाठी आपण कटिबध्द रहाल, अशी अपेक्षा व्यक्त करत नाईक यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

सदाशिव नाईक हे अनेक वर्षांपासून सामााजिक क्षेत्रात काम करत असून रामोशी समाज तसेच बेडर समाजाच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धैर्या बहुआयामी प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व : प्रा. मिलिंद जोशी

संबंधित बातम्या