कराड : मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे कोल्ड्रिंफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात औषध तपासणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
कराड शहरातही रिलाइफ सिरफ नावाचे औषध आढळून आले असून, हे औषध तातडीने सील करण्यात आले आहे. तर रेस्पिफ्रेश टीआर सिरफ या औषधाचीही तपासणी सुरू आहे. ही दोन्ही औषधे बालकांच्या श्वसनासंबंधी आजारांसाठी वापरली जात होती. तपासणीत या औषधांमध्ये घातक घटक आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारने यासंबंधी स्पष्ट निर्देश दिल्याने जिल्हा प्रशासन व एफडीए सतर्क झाले आहे. कराड शहरातील औषध दुकानांवर प्रशासनाकडून तपासणी मोहिम राबवण्यात आली. औषध निरीक्षकांनी नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. परिणाम येईपर्यंत संबंधित औषधे विक्रीस ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.एफडीएचे अधिकारी सांगतात की, नागरिकांनी ही औषधे त्वरित वापरणे टाळावे.