सातारा : सातारा एसटी स्टँड समोरील भाजी मंडईतून अज्ञात चोरट्याने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दत्ताजी श्रीप्रकाश देशमुख रा. शाहूनगर, सातारा हे भाजी घेण्यासाठी एसटी स्टँड समोरील भाजी मंडईत गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या वरच्या खिशातून त्यांचा मोबाईल चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा