01:58pm | Oct 05, 2024 |
सातारा : वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेवून विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडेच..,मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच सरपंच... अशा ‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी सत्तेचे केंद्रीकरण करून मतदार संघात दहशत माजवली आहे, मात्र मी संघर्षनायक आहे, जनतेच्या कल्याणासाठी गेली २२ वर्षे संघर्ष करतोय. आता घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभेच्या मैदानात उतरलो आहे, असा इशारा शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी महाबळेश्वरच्या कोयना खोऱ्यात वाळणे ता.महाबळेश्वर येथील जनसंवाद यात्रा मेळाव्यात दिला.
महाबळेश्वर परिसरातील तळदेव व कोयना खोऱ्यातील वळणे, आहिर, गाढवली या गावातील नागरिकांशी संवाद साधला. कोयना खोऱ्यातील २२ गावातील नागरिक महिलांनी जनसंवाद यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी मतदारांनी विद्यमान आमदार यांच्या निष्क्रिय व विकासकामाकडे करीत असलेल्या दुर्लक्ष या बाबत गाऱ्हाणे मांडले. पुरुषोत्तम जाधव यांच्या सारखा सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील, गरिबीची जाण असलेला वारकऱ्यांचा मुलगा व जनतेत मिसळणारां लोकप्रतिनिधी आम्हाला हवा आहे. असे स्पष्ट मत व्यक्त केले.
यावेळी शिवसेना महाबळेश्वर तालुका प्रमुख संजय शेलार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाबळेश्वर निमंत्रित सदस्य चंदू गुरुजी सपकाळ, लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेना खंडाळा तालुका प्रमुख भूषण शिंदे सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोयना व कांदाटी खोऱ्यात मोठा विकास निधी व आरोग्य सेवा पोहचल्या आहेत. अनेक कामे प्रगती पथावर आहेत, या भागातील पर्यटन वाढीसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असून आता दुर्गम भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मतदार संघावर शिवसेनेचा महायुतीकडे ’दावा’
वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार यांचे विरोधात मतदारांचा प्रचंड रोष असून राष्ट्रवादी काँग्रेस फुटीमुळे व शिवसेनेची या मतदार संघावर असलेली प्रचंड पकड यासह मुखमंत्री यांचे असलेले मूळ गाव याच मतदार संघात असल्याने या मतदार संघावर शिवसेनेने दावा केला आहे.
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |
मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |
जाचहाटप्रकरणी 4 जणांवर गुन्हा |
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई |
अतित येथे अवैध दारु प्रकरणी कारवाई |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु |
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार |