भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी; दि. १० डिसेंबर २०२५ रोजी मुलाखती

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा   :  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 15 डिसेंबर  ते 24 डिसेंबर  2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 64 आयोजित करण्यात येत आहे. सदर कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

 सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथे दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी मुलाखतीस हजर रहावे मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-६४ कोर्ससाठी (किंवा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेवून व ते पुर्ण भरुन सोबत घेवून यावे.

सदर एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत. कंबाईड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे, एन.सी.सी. 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी,  टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन. ले. कर्नल हंगे स. दे. (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कायदा व सुव्यवस्थेसाठी अफजलखान कबरीच्या परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी
पुढील बातमी
नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात ६३ गुन्हेगार हद्दपार; कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिस ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या