08:50pm | Nov 06, 2024 |
कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीच्या दौर्यात त्यांनी व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दौर्यात कराडमधील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत बाबांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार केला. यावेळी शहरातील सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला विकास प्रत्यक्ष डोळ्याने दिसत आहे. मात्र विरोधकांनी विकासाची केवळ पोस्टरबाजी केली आहे. त्यांच्या ढोंगीपणाला न भुलता पृथ्वीराज बाबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवूया, असा निर्धार ठिकठिकाणच्या भेटी दरम्यान नागरिकांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत वलयांकित ठरले आहेत. स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक कारभार व उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा देशात लौकिक झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बोट आदर्श घोटाळ्यात सापडल्यानंतर राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज बाबांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात धाडले. आदर्श घोटाळ्यावरून राज्यातील नेत्यांवर जनता नाराज होती. नेमक्या याच नाराजीला मूठमाती देण्यासाठी पृथ्वीराज बाबांनी राज्यात अनेक योजना व विकास साधत आपली प्रतिमा उंचावली.
सहाजिकच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचेही रुप पालटवण्यात पृथ्वीराज बाबांना यश आले आहे. विकासाची दूरदृष्टी ठेवून त्यांनी कराडमध्ये मध्यवर्ती बसस्थानक, सुसज्ज प्रशासकीय इमारत, पोलीस वसाहत, कृष्णा नदीकाठी संरक्षक भिंत, शहराला जोडणार्या पाच प्रमुख रस्त्यांचे विस्तारीकरण, भूकंप संशोधन केंद्र, एम - एच 50 व आरटीओ ऑफिस, शासकीय कृषी महाविद्यालय या प्रमुख गोष्टी उभारत कराड शहराचा चेहरामोहरा बदलला.
कराड जिल्हा करण्यासाठी लागणार्या सर्व पायाभूत सुविधा त्यांनी उभारत कराडकरांना विश्वास दिला. या बळावर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना कराड शहरात प्रचारादरम्यान संवाद साधताना प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी शहरातील व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना मांडल्या.
पृथ्वीराज बाबांकडे विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांनी कोणताही भेदभाव न करता आपले कार्य सुरू ठेवले आहे. त्यांनी केलेल्या विकासामुळे कराडला वेगळी ओळख मिळाली. राज्यातील विकसित शहर म्हणून कराडचा लौकिक झाल्यामुळे शहरात औद्योगिक व शैक्षणिक क्रांती झाली आहे. अशा नेत्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार कराड शहरातील नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आ. पृथ्वीराज चव्हाण यांना नागरिकांच्या भेटीवेळी सदरच्या प्रतिक्रिया व भावना ऐकायला मिळाल्या.
बनपुरीकर कॉलनीतील बैठकीत एक नागरिक म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर एकाने 108 कोटी, एकाने 96 कोटी तर एकाने 209 कोटी रुपयांचे विकासकामे मंजूर झाल्याचे पोस्टर लावून केवळ विकासाचा भ्रम निर्माण केला. मात्र पृथ्वीराज बाबांनी हे न करता त्यांनी प्रत्यक्ष विकास केला आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1800 कोटी रुपयांची कामे केली. कराड हे रचनात्मक व सुसज्ज शहर बनवत मी ग्रामीण भागाचाही चेहरा बदलला. गावोगावी व वाडी वस्तीवर कोट्यवधीचा विकासनिधी दिला. यातून आपला मतदारसंघ आयडॉल करण्याचा मानस ठेवून योजना आखली. यास मोठे यश मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यानंतर विरोधी सदस्य म्हणून आम्हाला विकास निधी देताना भाजपने खूप कुचराई केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाची घडी बसविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तोच कोरोनाची महामारी आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून पुन्हा भाजपचे सरकार आणले. व पुन्हा या भाजपने सापत्न वागणूक देत निधी दिला नाही. तरीही आम्ही कराड दक्षिणसाठी जवळजवळ 1500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. कराड व मतदारसंघातील जनतेचे प्रेम मी विसरू शकत नाही.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरात ठिकठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रत्येक ठिकाणी चहापान करण्यासाठी आग्रह करण्यात आला. हा आग्रह स्वीकारत त्यांनी आपला साधेपणा व सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची परंपरा कायम राखत त्यांची मने जिंकली. तर ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक वर्गाबरोबर फोटोसेशनही केले.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |