पूर्व लेबनॉन मध्ये इस्रायलने आणखी एक मोठा हल्ला केल्याचे समोर आले आहे. गुरूवारी केलेल्या हल्ल्यात कमीत-कमी ४७ लोक मारले गेले आहेत. एका लेबनॉनी अधिकाऱ्याने सांगितले की, युद्धविराम चर्चा पुढे नेण्यासाठी इराण-समर्थित हिजबुल्लाह गटाच्या विरोधात कारवाई वाढवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थांकडून इस्रायलवर दबाव आणला जात आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांची भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून तातडीने कोणतेही वक्तव्य आले नाही.
यावरून असे दिसून येते की, युद्ध विरामासाठीच्या चर्चेदरम्यान अजुन काही गोष्टींचा अडथळा आहे जो दूर होणे बाकी आहे. एका वरिष्ठ लेबनीज अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की बेरूतने दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याची लवकर माघार सुनिश्चित करण्यासह यूएस युद्धविराम प्रस्तावात बदल करण्याची मागणी केली आहे. इस्रायल आणि सशस्त्र, इराण-समर्थित हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हा सर्वात गंभीर प्रयत्न आहे, जो एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या गाझा युद्धाच्या प्रादेशिक स्पिलओव्हरचा भाग आहे.
इस्रायलने लेबनॉनवर सीरियाच्या सीमेशी लागून असलेल्या भागात हा हल्ला केला. लेबनॉनच्या बालबेक-हर्मेल प्रांताचे गव्हर्नर बाचिर खोदरने सांगितले की, बालबेक क्षेत्रात इस्रायली हल्ल्यात कमीत-कमी ४७ लोक ठार झाले तर जवळपास २२ लोक जखमी झाले आहेत. त्यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली की, या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. हा सीरियाशी लागून असलेला परिसर आहे. जेथे शिया इस्लामवादी हिजबुल्लाहचा दबदबा आहे. इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह नियंत्रित दक्षिणी उपनगरांवर एक डझनहून अधिक हल्ले चढवले. यामध्ये आकाशात काळे ढग पसरले. यामुळे बेरूत चांगलेच हादरले. हा लेबनॉनवरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
