सातारा : देशमुख कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सदानंद वासुदेव जामदार रा. देशमुख कॉलनी, सदर बाजार, सातारा यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.
देशमुख कॉलनीत सुमारे अडीच लाखांची घरफोडी
by Team Satara Today | published on : 02 December 2024