सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब ता.सातारा येथे मारहाण झाल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रंजना सापते, आकाश सापते, हर्षल सापते यांच्या विरुध्द ताराबाई दिलीप वर्णेकर (वय 45, रा. लिंब) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 1 मार्च रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा