सातारा विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह भेटीतून मतदान प्रक्रिया सुरु

by Team Satara Today | published on : 15 November 2024


सातारा : २६२- सातारा विधानसभा मतदार संघामध्ये वयोवृध्द व जेष्ठ नागरीकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी   गृह भेटीतून मतदान घेण्यासाठी 8 पथके तयार करणेत आलेली असून, सदर पथकांनी दिनांक १३ नाव्हेबंर २०२४ व १४ नाव्हेबंर २०२४ रोजी पासून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.  अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली. 

विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २६२- सातारा या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्ष वंदना वैदय  यांनी बुधवार दिनांक दिनांक १३ नाव्हेबंर  रोजी, २६२ सातारा विधानसभा मतदार संघामध्ये सातारा शहरातील राजवाडा परिसरातील क्रमांक ६,७ व ८ या गृह भेटीद्वारे मतदान घेणाऱ्या पथकांना अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी पथकातील सर्व कर्मचारी यांचे मार्फत वयोवृध्द व जेष्ठ नागरीकांना होम वोटींगची सुविधा कशाप्रकारे दिली जात आहे, यांची प्रत्यक्ष पाहणी करुन जेष्ठ नागरीक व वयोवृध्द नागरिक यांच्याशी संवाद साधून ज्येष्ठ नागरिकांची    मते जाणून घेतली.

सदर भेटीवेळी जेष्ठ नागरीकांनी सातारा व जावली परिसर हा दुर्गम भागामध्ये येत असल्याने बऱ्याच वयोवृध्द व जेष्ठ नागरीकांना मतदानाचा हक्क बजावणेमध्ये अडचणी येत होत्या अशी माहिती देवून गृह भेटीद्वारे मतदान या सुविधेबाबत ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत आनंद व समाधान व्यक्त केले.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विविध तालुक्यामध्ये मतदान जनजागृती
पुढील बातमी
आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली

संबंधित बातम्या