सातारा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी सातारा यांच्या करवी राष्ट्रपती मुर्मू यांना दिले आहे, अशी माहिती पत्रकारांना कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदन देताना कॉंग्रेसचे जगन्नाथ कुंभार, कल्याण देशमुख, अनवर पाशा खान, सुरेश इंगवले, संतोष डांगे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेत्तात म्हटले आहे की, अठराव्या लोकसभेचे सत्र सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात आला आहे. लोकशाहीला आणि संविधानाला ही धोक्याची घंटा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी कारवाई करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
