संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा

by Team Satara Today | published on : 12 November 2024


कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाविकास आघाडी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आ. चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण (भाभी) यांचा वारकरी शाल, तुळशीचा हार घालून सत्कार करून समितीने आपली भूमिका जाहीर करत पाठिंबा दिला.

संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने आ. चव्हाण यांना पाठिंब्याचे पत्र दिले. या पाठिंबा पत्रामध्ये असे नमूद केले आहे की, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संतभूमीसाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामधील अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे श्री क्षेत्र देहू जवळील संत तुकोबारायांची ध्यान साधना तपोभूमी भंडारा भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून सन 2011ला शासनाने घोषित केले. व त्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक, पुरातत्व विभागाद्वारे अधिसूचनाही जारी केली. त्यामुळे या संपूर्ण पवित्र क्षेत्राला आज सुरक्षितता प्रदान झाली आहे.

येथील वारकरी धर्माचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने सदर न्याय्य अधिसूचनांचे कायदेशीर पालन होण्यासाठी त्वरीत अद्यादेश काढावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा व संघर्ष केला. परंतु आपलेनंतर कोणत्याच सरकारने  संवेदनशीलपणे दखल घेतली नाही. त्यामुळे डाऊप्रमाणे पुन्हा वारकर्‍यांवर आंदोलनाची वेळ आली आहे.

आम्हा वारकर्‍यांस विश्वास वाटतो की, हे पवित्र काम आपणच पूर्ण करू शकाल. त्यासाठी आपणास मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे व हे ऐतिहासिक कार्य पार पाडावे. यासाठी राज्यातील तमाम जनता जनार्दन, वारकरी, फडकरी दिंडीच्यावतीने शुभेच्छा, आशीर्वाद व जाहीर पाठिंबा दिला जात आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॅनडात हिंसाचाराच्‍या भीतीने त्रिवेणी मंदिरातील कार्यक्रम रद्द!
पुढील बातमी
पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत!

संबंधित बातम्या