कराड : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या तडीपार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केले. शहरातील दत्त चौक परिसरात शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
निशीकांत निवास शिंदे (वय 23, रा. रेठरेकर कॉलनी, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार आरोपी शहरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांना मिळाली होती.
त्यावरून सहाय्यक निरीक्षक भापकर, उपनिरीक्षक मगदुम तसेच कर्मचारी गायकवाड, सांडगे, कोरडे आदींचे पथक त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी निशीकांत शिंदे हा दत्त चौक परिसरात फिरताना आढळला. पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. निशिकांत शिंदे याला 5 जून 2024 रोजी सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचा आदेश पोलीस अधिक्षकांनी दिला होता. या आदेशाचे त्याने उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेवून अटक करण्यात आले.