सातारा : शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सातार्यात दिनांक आठ व नऊ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष राजू गोरे व स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे.
उत्सव समितीने दिलेल्या पत्रकात सर्व कार्यक्रमाचा तपशील सविस्तर नमूद करण्यात आला आहे. दिनांक 8 रोजी सकाळी 9 ते 12 यादरम्यान नाना पालकर भवन शिर्के मैदान गुरुवार पेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध इतिहास वक्ते सुनील बापू लाड यांचे न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. दिनांक 9 रोजी सकाळी साडेसात वाजता शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला महा अभिषेक करण्यात येणार आहे व सायंकाळी साडेपाच वाजता गांधी मैदान राजवाडा येथून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सातार्यात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सातारा नगरपालिकेचे या उत्सवासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. संयोजन समितीचे कार्याध्यक्ष हरीश पाटणे, उपाध्यक्ष अमोल मोहिते, अभिजीत बारटक्के, रवींद्र माने, नंदकुमार सावंत, अमर बेंद्रे, सागर पावशे, शुभम शिंदे, विक्रम पाटील, सयाजी चव्हाण, समीर देशपांडे, अक्षय गवळी, रवींद्र भारती, अजिंक्य गुजर, उमेश जगताप या सर्व सदस्यांचे या सोहळ्यासाठी सहकार्य लाभले आहे.