खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीसाठी पोलिसांकडून लाखाचे इनाम

by Team Satara Today | published on : 02 April 2025


सातारा : हत्या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय उर्फ काका व्यंकट निंबाळकर याला पकडून देणार्‍यास पोलिसांकडून एक लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी, सातार्‍यातील आदर्की खुर्द, ता. फलटण गावच्या हद्दीत बदनामी केल्याच्या संशयातून दोघांनी एकावर कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली. रत्नशिव संभाजी निंबाळकर (रा. आदर्की खुर्द) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय उर्फ काका व्यंकट निंबाळकर, विनोद महादेव राक्षे (दोघेही रा. आदर्की खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील विनोद राक्षेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कमलेश संभाजी निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.

मात्र, या गुन्ह्यातील दत्तात्रय उर्फ काका व्यंकट निंबाळकर हा फरार आहे. हा आर्मीतून पळून आलेला असून त्याचे केस लहान (फौजी कट) आहेत. डोळे काळे, वजन 90 किलो, उंची 6 फूट, रंग सावळा आहे.

या आरोपीची माहिती सांगणार्‍यासाठी एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. माहिती सांगणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

संबंधिताबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर (9923388756), लोणंदचे प्रभारी पोलीस अधिकारी सुशील भोसले (7738147796), स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे (9421810785), पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे (9405461830), परितोष दातीर (9420464227), पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम (7972494640) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर भाजप मधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर
पुढील बातमी
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या