काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

by Team Satara Today | published on : 22 May 2025


काश्मीर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण होत असतानाच काश्मीरमधील दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी लष्कराने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, आज काश्मीरमधील किश्तवाड येथे सुरू झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना घेरलं असून, त्यापैकी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चकमक अद्याप सुरू असून, आणखी दोन दहशतवादी या परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे.

या चकमकीबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरक्षा दलांनी किश्तवाडमधील सिंहपोरा, चटरू परिसरात ३ ते चार दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर शोधमोहीम सुरू करत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. लष्कर आणि सुरक्षा दलांकडून संयुक्त कारवाई सुरू असून, घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. परिसराला पूर्णपणे घेराव घालण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले चार दहशतवादी अद्याप फरार आहेत. लष्कराकडून त्यांच्या शोध सुरू आहे. हे दहशतवादी घनदाट जंगलात लपून बसले असण्याची किंवा पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्तीचा प्रवेश
पुढील बातमी
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

संबंधित बातम्या