सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ, जावली विधानसभा मतदारसंघ, आणि सातारा शहर शिवसेना यांच्यावतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शिवसेना सहसंपर्कप्रमुख एकनाथ दादा ओंबळे, उपजिल्हाप्रमुख विकास अण्णा शिंदे, तालुका प्रमुख समीर गोळे, आणि शहरप्रमुख निलेश मोरे, ओबीसी सेल शहरप्रमुख पवित चोरगे, शहरसंघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख अजिंक्य राजपूत, अमोल खुडे, विक्रम यादव, सयाजी शिंदे, ओंकार बर्गे, सोपान चिकने, सचिन वाईदंडे, आझाद मुलानी फलटण तालुका प्रमुख-हेमंत सुतार, रामवाडी सरपंच -श्रीरंग गलगले, युवा सेना-सुधीर करंदकर आदी उपस्थित होते.