सातारा : वाढे फाटा (सातारा) येथील चहाच्या दुकानाजवळून आकाश नेताजी कुचेकर (वय 25, रा. रेवडी, ता. कोरेगाव) यांचे मंगळवारी (दि. 25) चारचाकी वाहनातून अपहरण करुन, मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथून आकाश कुचेकर यांचे शुभम मोरे, ओम मोरे, अतुल पवार, आदित्य आवारे व साहिल सकुंडे (सर्व रा. रेवडी) यांनी अपहरण करुन, त्यांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केली. या मारहाणीत कुचेकर हे जखमी झाले आहेत. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महिला पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.