सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोडोली येथील साई सम्राट दहाव्या समोर संदीप बबन जाधव रा. कोडोली, ता. सातारा यांना कोणत्यातरी धारदार शास्त्राने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच ऋषिकेश शशिकांत पवार आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.