सातारा : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात सोमवार दि. 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत आयुष निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यिचित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.
या शिबीरामध्ये आयुर्वेद चिकित्सेने आम्लपित रथोल्य उपचार, होमिओपॅथी चिकित्सेने श्वसन संस्था विकार, मुत्राश्मरी उपचार, युनानी चिकित्सेने त्वचाविकार यावर उपचार व योग चिकित्सेने वार्धकजन्य आजार, वातव्याधी उपचार मार्गदर्शन व आयुष तज्ञामार्फत औषध उपचार व पंचकर्म करण्यात येणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
