आईच्या खुनप्रकरणी मुलाला जन्मठेप; रहिमतपूर येथील २0२१ मधील घटनेचा निकाल; जिल्हा न्यायालयाचा निर्णय

by Team Satara Today | published on : 13 February 2026


सातारा : आई सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाटा मारून खून केल्याप्रकरणी शहाजी लाला पवार (वय ३६, रा. एसटी स्टॅंडजवळ, रहिमतपूर, ता. कोरेगाव) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी हा निकाल दिला.

६ ऑगस्ट २०२१ रोजी रहिमतपूर येथे ही घटना घडली होती. सुलचोना लाला पवार (वय ७०) या महिलेचा त्यांच्या मुलानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. किरकोळ वादातून आरोपीने संतापाच्या भरात वाहनाचा लोखंडी पाटा डोक्यात व तोंडावर मारून आईची हत्या केली होती.

याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि गणेश कड यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. महेश कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस विनोद मोरे यांनी काम पाहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मेडिकल कॉलेजच्या कामाच्या दर्जाबाबत तडजोड चालणार नाही : ना. शिवेंद्रसिंहराजे; मेडिकल कॉलेजच्या पाहणीप्रसंगी अधिकाऱ्यांना सक्त सूचना
पुढील बातमी
साताऱ्यात मोळाचा ओढा येथे चिकन सेंटरमध्ये घुसून मारहाण; दुकानातील तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या