महेश कार्यगौरव पुरस्काराने निलेश लाहोटी सन्मानित

by Team Satara Today | published on : 08 August 2024


सातारा : माहेश्वरी समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महेश कार्यगौरव या पुरस्काराने निलेश लाहोटी यांना सन्मानित करण्यात आले.

सातारा येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेची कार्य समिती बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हा माहेश्वरी समाजाने निलेश लाहोटी यांना महेश कार्य गौरव पुरस्कार देऊन त्यांचा उचित सन्मान केला. निलेश लाहोटी यांना त्यांच्या 28 वर्षाच्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमास माहेश्वरी सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुसूदन गांधी, सातारा जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सुदीप भट्टड, सातारा शहर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मनीष लाहोटी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

निलेश लाहोटी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सातारा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उत्पादन शुल्क तसेच प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जावलीत दारुचा महापूर
पुढील बातमी
मतदान केंद्र  बदलांबाबतची माहिती मतदारांपर्यंत पोहचवा :  मतदार यादी निरीक्षक चंद्रकांत पुलकुंडवार

संबंधित बातम्या