युवकाचा बुडून मृत्यू

by Team Satara Today | published on : 10 March 2025


खंडाळा : मिरजेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पायकडा या शिवारातील पाझर तलावात हात-पाय धुण्याकरता गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा आई-वडीलांसमोर पाण्यात बुडून मृत्यू झाला. रितेश मोहन साळुंखे (वय 19, रा.मिरजेवाडी, ता.खंडाळा) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, कात्रज, पुणे येथे कामानिमित्त स्थायिक असलेले मोहन साळुंखे हे मूळगावी मिरजेवाडी ता. खंडाळा येथे गहू काढण्याकरता मुले व पत्नी समवेत आले होते. गहू काढणी झाल्यानंतर रितेश हा शेतानजिकच्या पाझर तलावावर हात-पाय धुण्याकरता गेला होता. यावेळी पाण्यात तोल जावून तो पडला. पाण्याचा आवाज आल्याने मोहन साळुंखे व त्यांच्या पत्नीने धाव घेतली. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही. त्यामुळे रितेश पाण्यात बुडाला. यावेळी आई-वडिलांनी केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रितेशला तलावातून बाहेर काढण्यासाठी शिरवळ रेस्क्यू टिम, भोईराज आपत्ती व्यवस्थापन संघ भोर यांना पाचारण करण्यात आले. चार तासानंतर रितेशचा मृतदेह शोधण्यात यश आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आ. रवींद्र धंगेकर काँग्रेसमधून बाहेर
पुढील बातमी
कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा

संबंधित बातम्या