सातारा : दिल्लीत येथे दि. १२ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान दिल्ली येथे आयोजित “The Flavours of Maharashtra या महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवामध्ये झालेल्या सातारा जिल्ह्यातील ४ स्वयंसहाय्यता गटांनी सहभाग नोंदविला असून गटांच्या खाद्य महोत्सवास दिल्लीकरांनी बेहद पसंदी दिली. यामध्ये राज्यातून २५ स्वयंसहाय्यता समूहांनी त्यांचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यामधून जिल्ह्यातील ४ स्वयंसहाय्यता गटांच्या खाद्यपदार्थांची एकूण अडीच लक्षची ३ दिवसात विक्री झाल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी माहिती दिली.
दि. १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे संपन्न झालेल्या खाद्यमहोत्सवामध्ये साता-यातील पाटण तालुक्यातील सिताई खर्डा मटन, माण तालुक्यातील जागृती महिला बचत गटाची विशेष मटन थाळी, भरली वांगी आणि ठेचा, याचा समावेश होता तर, सातारा तालुक्यातील नवदुर्गा समुहाचे सातारी कंदी पेढे व महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचे स्ट्रोबेरी रोल, मिल्कशेक इ. उत्पादनांचा सहभाग होता.
दिल्लीत समापन्न झालेल्या खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा परिचय दिल्लीकरांना झाला. दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनात सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबाबत महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विश्वास सिद यांचे आभार व्यक्त केले.