कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. आता या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सध्या अनेक मतदारसंघातील कौल समोर आला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार येणार याचा अंदाजही एक्झिट पोलने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचे भाकीत केले आहे. त्यात आता राज्यातील बहुतांश जागी महायुतीच आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 152 जागा लढवल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत मौन बाळगल्याचे दिसून आले होते. तर भाजपच्या होर्डिंग्जवर 2022 मध्ये उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेल्या फडणवीसांची छायाचित्रे ठळकपणे दिसून आली. अशा स्थितीत विजयानंतर महाआघाडीत मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीपूर्वी बैठकांची फेरी सुरू आहे. त्यात कोल्हापूरचे काय चित्र आहे हे सध्या समोर येताना दिसत आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 2959 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी) आहेत. तर राधानगरीमधून प्रकाश अबिटकर 6800 आघाडीवर आहे. याशिवाय, कागलमधून हसन मुश्रीफ 2104 मतांनी आघाडीवर (सातवी फेरी) आहेत.
राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 आघाडीवर
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे 11977 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी) आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 5975 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी), शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी (पाचवी फेरी) आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर शाहूवाडी सत्यजित पाटील 1651 आघाडीवर (चौथी फेरी), चंदगडमधून शिवाजी पाटील 3500 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी) आघाडीवर दिसत आहे. याशिवाय, करवीरमधून चंद्रदिप नरके 6500 मतांनी आघाडीवर (तिसरी फेरी), हातकणंगलेमधून अशोकराव माने 8200 मतांनी आघाडीवर (तिसरी फेरी) आघाडीवर आहेत.
तसेच कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 2959 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी), राधानगरीमधून प्रकाश अबिटकर 6800 आघाडीवर, कागलमधून हसन मुश्रीफ 2104 मतांनी आघाडीवर (सातवी फेरी), इचलकरंजीमधून राहुल आवाडे 11977 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी), कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 5975 मतांनी आघाडीवर (पाचवी फेरी), शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 15781 मतांनी (पाचवी फेरी) आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
चंदगडमधून शिवाजी पाटील 3500 मतांनी आघाडी :
शाहूवाडी सत्यजित पाटील 1651 आघाडीवर (चौथी फेरी), चंदगडमधून शिवाजी पाटील 3500 मतांनी आघाडीवर (चौथी फेरी), करवीरमधून चंद्रदिप नरके 6500 मतांनी आघाडीवर (तीसरी फेरी), हातकणंगलेमधून अशोकराव माने 8200 मतांनी आघाडीवर (तिसरी फेरी) असल्याचे समोर आले आहे.