वेगवेगळ्या घटनेत दोनजण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 21 September 2024


सातारा : सातारा शहरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत दोनजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील पोवई नाका येथून सिध्दी संजय मांडवे (वय 18, रा. इंग्लिश स्कूल शेजारी सुमित्राराजे सोसायटी, सातारा) ही कोणास काहीही न सांगता दि. 19 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास निघून गेली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात सुजाता संजय मांडवे (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोहिते तपास करत आहेत.
दुसर्‍या घटनेत, सदरबझारमधील भिक्षेकरी पुरुषगृहातील कपिल भगत जोराज महातो यादव (वय 35, मूळ रा. झारखंड) हा दि. 19 रोजी कोणास काहीही न सांगता निघून गेले आहेत. या प्रकरणी परिमल पितांबर मोरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार मेचकर तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरातून सोन्याची माळ चोरीस
पुढील बातमी
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या